Today’s Horoscope 24 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 24 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 24.03.2024.

शुभाशुभ विचार- होलीका वर्ज्य.

आज विशेष – हुताशनी पौर्णिमा (होळी).

राहू काळ – संध्याकाळी 4.30  ते 06.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 7.34 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 14.20  पर्यंत नंतर कन्या.

—————————–

मेष ( शुभ रंग- तांबडा)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. मुलांचे लाड नकोत.

मिथुन (शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमाचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून घडेल.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावाला कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

सिंह ( शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)

आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. आज दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित मोठा खर्च संभवतो.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे.

वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)

उच्चशिक्षित मंडळींना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस आहे.

धनु (शुभरंग- स्ट्रॉबेरी)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वेगाने वाटचाल होईल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

मकर (शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. आज मित्रांना दुरूनच रामराम केलेला बरा.

कुंभ ( शुभरंग- डाळिंबी)

आज आपल्या मर्यादित रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचेच सल्ले देतील.

मीन (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहतील. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवलेली बरी.

 शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.