Today’s Horoscope 26 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

26.02.2023.

शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.

आज विशेष- भानुसप्तमी.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – कृत्तिका.

चंद्र राशी – मेष 10.14  पर्यंत नंतर वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचे म्हणणे ऐकून घ्या.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

आज घरात वडीलधाऱ्यांच्या लहरी सांभाळाव्या लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी.)

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.

कन्या ( शुभ रंग- मरून)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत होईल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)

आज तुमचं कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज तुमचे चांगले सूर जुळतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात सावध रहा

मकर ( शुभ रंग- आकाशी )

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कलेच्या क्षेत्रात नवोदिताना उत्तम संधी चालून येतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मीन -(शुभ रंग – भगवा )

कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आज जरा आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.