Ahmednagar News : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग

एमपीसी न्यूज- अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला काल (दि . 25) भीषण आग लागली.कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात ही घटना घडली आहे. 

आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या व आग विझवण्याचं काम सुरू झाले. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Today’s Horoscope 26 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.25)  संध्याकाळी गंगामाई साखर कारखान्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी डिस्टिलरी विभागाला अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच कामगारांंमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक कामगार जीव मुठीत घेऊन कारखान्यातून बाहेर पडले. घटनास्थळी ठरावीक (Ahmednagar News) कालावधीत छोटे-छोटे स्फोट होत आहेत..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.