Today’s Horoscope 27 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 27.12.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस. 

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते  01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा 23.29 पर्यंत नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – तांबडा )

आज कार्यक्षेत्रात विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

आज काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत सांभाळा.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)

तुमच्या कार्यक्षेत्रातील अतिव्यस्तते मुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. आज अतिव्यस्त दिवस.

तूळ – ( शुभ रंग- निळा)

नोकरीत साहेबांची मर्जी राखावी लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची उत्तम साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे मनात येईल. ज्येष्ठांनी सत्संगातच रमावे.

वृश्चिक – ( शुभ रंग – राखाडी)

आज जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून लांबच रहा. पत्नी सांगेल ते योग्यच असेल.

धनु – (शुभ रंग- भगवा)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यास यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर- ( शुभ रंग – मोरपंखी)

नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)

सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही गरजूंनाही मदत कराल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.