Today’s Horoscope 29 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  रविवार  ….. ​दि​. 29 नोव्हेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – त्रिपुरारी पौर्णिमा.
  • राहू काळ – संध्याकाळी ०४.३०  ते ०६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृत्तिका.
  • चंद्र राशी – मेष १०.०१ पर्यंत नंतर वृषभ

 

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कुणालाही मोफत सल्ले वाटप मात्र करू नका.

वृषभ – ( शुभ रंग – आकाशी)

आज तुम्हाला संयमाची गरज असून अतिउत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याचे उल्लंघन भागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे

मिथुन   ( शुभ रंग- मरून)

आज काही फसव्या संधी चालून येतील हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी  विचार करणे गरजेचे आहे. गृहिणींनी झाकली मूठ झकुनच ठेवलेली बरी.

कर्क( शुभ रंग- हिरवा)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या प्रयत्नांना दैवाची हमखास साथ मिळेल. आपली अपुरी स्वप्ने साकार होतील.

_MPC_DIR_MPU_II

सिंह –  ( शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात तुमचा प्रगतिरथ वेगवान राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले काही निर्णय अचूक ठरणार आहेत. एखाद्या जिवलग मित्रास तुमच्या मदतीची गरज भासू शकेल.

कन्या ( शुभ रंग – लाल )

आज कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना नाकीनऊ येतील. वाद विवादात तटस्थतेचे धोरण स्वीकारा.

तूळ – (शुभ रंग- मोरपंखी)

आज काही कारणाने घरात थोर मंडळींशी मतभेद होतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

वृश्चिक –  ( शुभ रंग- क्रीम)

उद्योग-धंद्यात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. मित्रांमध्ये आज काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

धनु  (शुभ रंग- जांभळा)

अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची यशाकडे वाटचाल सुरूच आहे. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. दुपारनंतर थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल.

मकर – ( शुभ रंग – केशरी)

उच्च शिक्षितांची ध्येय साध्य होतील. नवोदित कलाकारांना चांगल्या प्रोजेक्टचे प्रस्ताव येतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसून येईल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील.

कुंभ –  ( शुभ रंग – गुलाबी)

कुटुंबात काही मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधान देईल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. आनंदी दिवस.

मीन  ( शुभ रंग- चंदेरी)

भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्त्वाच्या कामासाठी पायपीट करावी लागेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like