Today’s Horoscope : 3 November जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज- आजचे पंचांग – Today’s Horoscope : 3 November जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – शुक्रवार.
03.11.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 10.30ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसु.
चंद्र राशी – मिथुन 25.24 पर्यंत नंतर कर्क.
—————————–
मेष – ( शुभ रंग- मोतिया )
कार्यक्षेत्रात आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज आलेली कोणतीच संधी वाया घालवू नका.
वृषभ (शुभ रंग- लाल )
एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
मिथुन ( शुभ रंग- राखाडी )
कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.
कर्क (शुभ रंग- पिस्ता )
काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. घरात पोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्यावेत. प्रवासात तब्येत सांभाळा.
सिंह (शुभ रंग- हिरवा )
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल.

कन्या ( शुभ रंग- डालिंबी)
तुमच्या कार्यक्षेत्रातील अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. अति व्यस्त दिवस.
तूळ ( शुभ रंग- पांढरा)
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे मनात येईल. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगात रमाबाई नोकरीत साहेबांची मर्जी राखाल.
वृश्चिक – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा आपल्या कवती बाहेरी जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोड बोल्या मंडळींपासून लांब राहा. पत्नी जे सांगेल ते योग्यच असेल.
धनु ( शुभ रंग – गुलाबी)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेत समर्थपणे तोंड द्यावे अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्ती कराल.
मकर – ( शुभ रंग – आकाशी)
नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.
कुंभ ( शुभ रंग -जांभळा)
सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्च शिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज प्रकृती उत्तम राहील.
मीन (शुभ रंग – भगवा)
अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज गरजूंना मदत कराल. आज गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.