Today’s Horoscope 30 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – सोमवार.
30.01.2023.
शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- कृत्तिका 22.15 पर्यंत नंतर रोहिणी
चंद्र राशी – वृषभ.
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना अनपेक्षित पणे येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. आजचे प्रवास त्रासदायक होऊ शकतात, फार अर्जंट नसतील तर टाळलेले बरे.
वृषभ (शुभ रंग- जांभळा )
महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करूनच घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले फार महत्त्वाचे असतील. कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशा पदरात पडेल.
मिथुन ( शुभ रंग- आकाशी )
आज तुमचा मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी करता येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची आज शक्यता आहे.
कर्क (शुभ रंग- पांढरा )
आज केलेल्या कोणत्याही चर्चा सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. शेअर्सच्या व्यवहारातील तुमचे अंदाज खरे ठरतील.
सिंह (शुभ रंग- लाल )
नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी तुमचा सलोखा वाढेल कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल संध्याकाळी प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.
कन्या ( शुभ रंग- क्रिम )
घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. परंतु तुम्ही त्यांच्या शब्दाचा मान रखाल. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील त्यांना दुरूनच रामराम करा.
तूळ ( शुभ रंग- मोरपंखी )
नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. हितशत्रू टपूनच बसलेत, सतर्क रहा.
वृश्चिक (शुभ रंग- राखाडी )
व्यवसायात तुमचे भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.
धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहणार आहेत. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी आज वसूल होतील.
मकर ( शुभ रंग- पिस्ता )
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. आज रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल.
कुंभ (शुभ रंग – मरून )
जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.
मीन -(शुभ रंग – हिरवा )
आजचा दिवस धावपळीचा आहे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.