Pimpri : फ्रॅक्चरच्या प्लास्टरवर चिमुकल्यांची कल्पकता

एमपीसी न्यूज – जसजशी मुले मोठी होत जातात. तसतसे मस्ती करण्याचे प्रमाण वाढते. त्यामध्ये काही मुले शांत असतात. तर काही‌ खोडकर असतात. (Pimpri) खेळत असताना लहान मुले बेधुंद होऊन खेळतात. यात त्यांना स्वतःचे भान राहत नाही. त्यामुळे त्यांना दुखापत होऊन हात, पाय फ्रॅक्चर होतात. फ्रॅक्चर झाल्यानंतर मुलांचे वेदनेवरील लक्ष विचलित करण्यासाठी पालकांकडून त्यांच्या कल्पकतेला वाव दिला जातो.

लहान मुलांना अनेकवेळा पालकांकडून सांगण्यात येते. रस्त्यावरून जोरात धावू नये, एकमेकांना खेळताना धक्का मारू नये, मात्र शाळेत गेल्यानंतर मुले खेळण्यांमध्ये धुंद होतात. तेव्हा खेळताना किरकोळ जखमा होतात. तर काही वेळेला हाता पायाला गंभीर मुकामार लागतो.

खेळताना लागल्यास हात, पाय किंवा इतर अवयवांना सूज येते, हात-पाय हलविण्यास त्रास होऊन भयंकर वेदना होतात. त्यामुळे पालक मुलांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुलांना झालेल्या (Pimpri) हातापायाच्या प्लास्टरवर बेस्ट फ्रेंडचे नाव लिहिण्यास सांगतात. त्यामुळे मुले आनंदीत होतात आणि त्यांचे वेदनेवरील लक्ष विचलित होते.

Chikhali : रात्री उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण

हाताला गुंडाळलेले प्लास्टर घेऊन मुले शाळेत जातात तेंव्हा त्यांच्या प्लास्टरवर मित्र, मैत्रिणींची नावे, आवडता कार्टून यांचे चित्र रेखाटताना दिसतात. (Pimpri) त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. घरातील मोठ्यांना देखील फ्रॅक्चर झालं असेल तेव्हा लहान मुले त्या फ्रॅक्चरवर चित्र काढतात. त्यामुळे  हे प्लास्टर एक प्रकारे वेदना विसरण्याचे साधन बनू लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.