Tokyo Olympic 2020 : बोल बजरंग बली की जय ! बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक

एमपीसी न्यूज – भारताचा स्टार कुस्तीपटू बंजरंग पुनिया याने कांस्यपदक जिंकले आहे. 65 किलो वजनी गटात खेळताना पुनिया याने कझाकिस्तानच्या पैलवानाला अस्मान दाखवत कांस्यपदकावर नाव कोरले.

 

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.

 

बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.