Pimpri news: दिवाळी सणानिमित्त वाहननोंदणीसाठी सुट्टीच्या दिवशी परिवहन कार्यालय सुरू

एमपीसी न्यूज: दिवाळी सणानिमित्त राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होत असते. या पार्श्वभूमीवर नवीन वाहनांची नोंदणी करून जनतेला वाहनांचा ताबा मिळावा तसेच शासकीय महसूल जमा व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवार २२ ऑक्टोबर आणि रविवार २३ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.