Chinchwad : लिफ्टमध्ये अडकल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हिरमोड

एमपीसी न्यूज – उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पाच मिनिटं अगोदर निवडणूक कार्यालयात पोहोचले मात्र लिफ्टमध्ये अडकल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे हिरमोड झाला आहे.

चिंचवड विधानसभा निवडणुकसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्व नेते आकुर्डीतील प्राधिकरणाच्या कार्यालयात दाखल झाले. पण कार्यालय सातव्या मजल्यावर असल्याने अर्ज भरण्याची मुदत संपली. त्यामुळे अर्ज न भरताच उमेदवारांना परतावे लागले.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, फजल शेख यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.