Chakan Crime News : ट्रकसह लोखंडी सळई घेऊन ट्रक चालक फरार

एमपीसी न्यूज – ट्रक आणि त्यामध्ये असलेली 2,400 किलो वजनाची लोखंडी सळई घेऊन ट्रक चालक फरार झाला आहे. शनिवारी (दि.26) शेलपिंपळगाव, हॉटेल वैष्णवी, ता. खेड येथे ही घटना घडली.

ट्रान्सपोर्ट व्यवसायिक काकसाहेब नाना कुत्तारवाडे (वय 48, रा. कामोठे, पनवेल, रायगड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाबु भाऊसाहेब सोनवणे (रा. आष्टी, बीड) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबु हा फिर्यादी काकासाहेब यांच्या MH 46 BB 7578 ट्रकवरती चालक आहे. ट्रकमध्ये 1 लाख 80 हजार रूपयांची सळई होती. आरोपी पार्किंगमधून ट्रकसह लोखंडी सळई घेऊन ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.