Turmp- Modi Conversation: अमेरिकेने भारताला दिले ‘जी-7’ शिखर परिषदेचे निमंत्रण!

Trump-Modi Conversation: US invites India to G-7 summit

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. ग्रुप ऑफ सेवनच्या (G-7) अमेरिकेच्या अध्यक्षपदाबाबत आणि या गटाच्या सध्याच्या सदस्यत्वाचा विस्तार करत भारतासह आणखी महत्वाच्या देशांचा समावेश करण्याचा मनोदय ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. ट्रम्प यांनी मोदी यांना अमेरिकेत होणाऱ्या पुढील जी -7 शिखर परिषदेसाठीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.

गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगून त्यांचा चीनशी सुरू असलेल्या वादाबाबत ते नाखूष असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमध्ये एवढ्यात कोणतेही संभाषण झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे ट्रम्प तोंडघशी पडले होते. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा दिली. भारत सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून त्याबाबत माहिती दिली आहे.

कोविड संकटानंतरच्या जागतिक परिस्थितीत येणारे वास्तव लक्षात घेऊन हा मंच विस्तारित करण्याची गरज लक्षात घेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सर्जनशील आणि दूरदृष्टी असलेल्या दृष्टीकोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली. या प्रस्तावित परिषदेच्या यशासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांसमवेत काम करण्यात भारताला आनंदच होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या सध्याच्या नागरी अशांततेबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि या परिस्थितीवर लवकर तोडगा निघावा अशी सदिच्छा व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी उभय देशातल्या कोविड-19 परिस्थिती, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती, जागतिक आरोग्य संघटनेतल्या सुधारणांची आवश्यकता यासह इतर सामायिक मुद्यांवर चर्चा केली.

या वर्षाच्या फेब्रुवारीमधल्या आपल्या भारत भेटीचे स्मरण ट्रम्प यांनी केले. ही भेट अनेक कारणांमुळे ऐतिहासिक आणि स्मरणीय ठरल्याचे सांगून या भेटीने द्विपक्षीय संबंधाना नवा आयाम प्राप्त झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.