Maharashtra Corona Update: दिवसभरात 2,287 नवे रुग्ण, 1,225 रुग्णांना डिस्चार्ज, एकूण सक्रिय रुग्ण 38,493!

Maharashtra Corona Update: 2,287 new patients, 1,225 patients discharged during the day, total active patients 38,493!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 1225 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 2287 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 38 हजार 493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 300 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 097 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 103 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:  ठाणे- 74 (मुंबई 49, ठाणे 1, नवी मुंबई 4, पनवेल 4, रायगड 6, मीरा भाईंदर- 10), नाशिक- 2 (नाशिक 1, अहमदनगर 1), पुणे- 21 (पुणे 10, सोलापूर 5, सातारा 6), कोल्हापूर- 3 (सांगली 3) अकोला-3 (अकोला 3).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 68 पुरुष तर 35 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 103 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत तर 39  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 103 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये ( 67 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2465 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 1 मे ते 30 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 65 मृत्यूंपैकी मुंबई 29, मीरा भाईंदर -9, सातारा -6, सोलापूर -4, नवी मुंबई -3, रायगड -3, सांगली 3, पनवेल -2, अकोला -3, ठाणे -1, नाशिक -1 आणि अहमदनगर – 1 असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (42,216), बरे झालेले रुग्ण- (17,213), मृत्यू- (1,368), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(6), ॲक्टिव्ह रुग्ण- (23,629)

ठाणे: बाधित रुग्ण- (10,404), बरे झालेले रुग्ण- (3,732), मृत्यू- (230), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (6442)

पालघर: बाधित रुग्ण- (1122), बरे झालेले रुग्ण- (443), मृत्यू- (33), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (646)

रायगड: बाधित रुग्ण- (1209), बरे झालेले रुग्ण- (621), मृत्यू- (51), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (535)

नाशिक: बाधित रुग्ण- (1212), बरे झालेले रुग्ण- (919), मृत्यू- (68), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (225)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (141), बरे झालेले रुग्ण- (60), मृत्यू- (7), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (74)

धुळे: बाधित रुग्ण- (173), बरे झालेले रुग्ण- (93), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (64)

जळगाव: बाधित रुग्ण- (760), बरे झालेले रुग्ण- (324), मृत्यू- (72), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (364)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (37), बरे झालेले रुग्ण- (27), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7)

पुणे: बाधित रुग्ण- (8196), बरे झालेले रुग्ण- (4317), मृत्यू- (348), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (3531)

सोलापूर: बाधित रुग्ण- (934), बरे झालेले रुग्ण- (443), मृत्यू- (75), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (416)

सातारा:  बाधित रुग्ण- (562), बरे झालेले रुग्ण- (178), मृत्यू- (22), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (362)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (543), बरे झालेले रुग्ण- (205), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (334)

सांगली: बाधित रुग्ण- (124), बरे झालेले रुग्ण- (63), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (57)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (52), बरे झालेले रुग्ण- (8), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (44)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (304), बरे झालेले रुग्ण- (118), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (181)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (1592), बरे झालेले रुग्ण- (1060), मृत्यू- (68), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (464)

जालना: बाधित रुग्ण- (130), बरे झालेले रुग्ण- (58), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (71)

हिंगोली: बाधित रुग्ण- (191), बरे झालेले रुग्ण- (106), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (85)

परभणी: बाधित रुग्ण- (71), बरे झालेले रुग्ण- (24), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (46)

लातूर: बाधित रुग्ण- (125), बरे झालेले रुग्ण- (69), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (53)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (80), बरे झालेले रुग्ण- (32), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (47)

बीड: बाधित रुग्ण- (47), बरे झालेले रुग्ण- (26), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (20)

नांदेड: बाधित रुग्ण- (129), बरे झालेले रुग्ण- (91), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

अकोला: बाधित रुग्ण- (642), बरे झालेले रुग्ण- (346), मृत्यू- (31), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (264)

अमरावती: बाधित रुग्ण- (245), बरे झालेले रुग्ण- (138), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (91)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (131), बरे झालेले रुग्ण- (99), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (31)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (73), बरे झालेले रुग्ण- (42), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (28)

वाशिम: बाधित रुग्ण- (8), बरे झालेले रुग्ण- (6), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2)

नागपूर: बाधित रुग्ण- (614), बरे झालेले रुग्ण- (381), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (222)

वर्धा: बाधित रुग्ण- (9), बरे झालेले रुग्ण- (1), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7)

भंडारा: बाधित रुग्ण- (32), बरे झालेले रुग्ण- (9), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (23)

गोंदिया: बाधित रुग्ण- (66), बरे झालेले रुग्ण- (45), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (21)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (26), बरे झालेले रुग्ण- (24), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (38), बरे झालेले रुग्ण- (12), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (26)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (62), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (15), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (47)

एकूण: बाधित रुग्ण-(72,300), बरे झालेले रुग्ण- (31,333), मृत्यू- (2,465), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(9),ॲक्टिव्ह रुग्ण-(38,493)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3730 झोन क्रियाशील असून आज एकूण 19 हजार 019 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 71.61 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.