गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Metro Train: संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे चालू मेट्रो ट्रेन मध्ये प्रथमच फॅशन शो व विविध कार्यक्रम 

एमपीसी न्यूज: पिंपरी ते फ़ुगेवाडी मेट्रो मार्गावरील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे चालू मेट्रो ट्रेन मध्ये प्रथमच फॅशन शो व विविध कार्यक्रम काल स्वातंत्र्य दिनानिम्मिताने आयोजित करण्यात आले होते.(Metro Train) याप्रसंगी मोठ्या संख्येने शहरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर यांच्या मार्फत संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार तसेच दिलीप सोनगिरा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Pratibha College: देश प्रेमाची भावना अखंडपणे तेवत ठेवा : कर्नल आर.डी. सिंग

यावेळी मेट्रो स्टेशन मध्ये प्रथमच चालू मेट्रोमध्ये फॅशन शो आयोजित करण्यात आला. स्टेशनवर फॅशन शो व विविध कार्यक्रम सुद्धा करण्यात आले.(Metro Train) तसेच मुलींनी लाठीकाठी याची प्रात्यक्षिके दाखविली. त्याचप्रमाणे मंगळागौरही सादर करण्यात आली.

याप्रसंगी मोठ्या संख्येने शहरातील महिला वर्गानी आणि नागरिकांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमात सहभागी कलाकारांना (Metro Train) ब्रँड अँबेसिडर अभय भोर,माधुरी पवार आणि दिलीप सोनगीरा, दुर्गा भोर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देण्यात आले.

 

spot_img
Latest news
Related news