Pune : रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना अटक

युनिट एकच्या पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना शिवाजीनगर व मंगळवार पेठ येथून सापळा रचून अटक करण्यात आली. युनिट एकच्या पोलिसांनी ही कारवाई केली.  

बाबा रघुनाथ सरोदे (वय 23, राहणार-806, कामगार पुतळा, शिवाजीनगर, पुणे), रुपेश राजेंद्र गायकवाड (वय 23, रा.228, मंगळवार पेठ, पुणे), अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

युनिट एकच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक इरफान मोमीन व श्रीकांत वाघवले यांना बातमी मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील तडीपार केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे बाबा रघुनाथ सरोदे हा कामगार पुतळा येथे सार्वजनिक रोडवर उभा आहे. या माहितीच्या आधारे युनिट एकच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी सरोदेला  पकडले.

युनिट एकच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना बातमी मिळाली की फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर येथे तडीपार केलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे रुपेश राजेंद्र गायकवाड हा मंगळवार पेठेतील त्याच्या घराजवळ वजनकाटा जवळ सार्वजनिक रोडवर उभा आहे. या बातमीची खात्री करून सापळा रचून आरोपी गायकवाड याला अटक केली.

सरोदे व गायकवाड या दोन्ही आरोपींवर पुणे शहरात शरीरावरील गुन्हे, अग्निशस्त्र बाळगणे, असे विविध गुन्हे दाखल आहेत. युनिट एकचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.