Delhi : अरुण जेटली, सुषमा स्वराज व जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर मनोहर पर्रिकरांना पद्मभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा

एमपीसी न्यूज – भाजप नेते अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. बॉक्सर मेरी कोम यांच्यासह एकूण ७ जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह १६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची केली.

_MPC_DIR_MPU_II

राज्यातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

पद्मभूषण सन्मानाचे मानकरी :

एम. मुमताज अली, सय्यद मुआझ्झीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. सेरिंग लँडोल, आनंद महिंद्रा, नीलकांत मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रिकर (मरणोत्तर), जगदीश शेठ, पी. व्ही. सिंधू, वेणू श्रीनिवासन. दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातील ११८ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.