Chikhali Crime News : तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘पैसे देऊन बाई वैशालीचे प्रकरण मिटव’ असे म्हणत दोघांनी एका तरुणाला धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 13) पहाटे पावणे चार वाजता मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

पंडितराव गणपती चौरे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणपती रामभाऊ चौरे (वय 65, रा. जीवाचीवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्याण चन्ने, राजेंद्र तांदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मोरेवस्ती चिखली येथे भाड्याने राहत होता. आरोपींनी त्याला ‘पैसे देऊन बाई वैशालीचे प्रकरण मिटव. नाहीतर तुला बघून घेईन’ अशा धमक्या दिल्या. आरोपींच्या या त्रासाला कंटाळून पंडितराव चौरे याने राहत्या घरात आत्महत्या केली.

दरम्यान पंडितराव याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे पंडितराव याने चिट्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.