Pune : दोन सराईत वाहन चोरांना अटक; 20 गाड्या जप्त

फरासखाना पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे शहर परिसरात वाहन चोरी करणा-या दोन सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केल्या आहेत. त्यांच्याकडून 20 गाड्या जप्त करण्यात आल्या. यापैकी एक आरोपी लग्नासाठी आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी वाहने चोरी करीत असे, अशी माहिती समोर आली आहे. 

संतोष विष्णू नागरे रा. गुरुदत्त कॉलनी भेकराई नगर हडपसर पुणे,  सागर शरद समगीर रा. वीर ता. पुरंदर जिल्हा पुणे, अशी आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी व घरफोडी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना फरासखाना तपास पथकातील शंकर कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम काळे रंगाची पल्सर घेऊन रविवार पेठ या ठिकाणी थांबले आहेत. अशी माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांना कळविले असता सदर ठिकाणी तात्काळ जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातील गाडी बद्दल चौकशी केली असता ती त्यांनी दत्त मंदिर शेजारून शुक्रवार पेठ येथून चोरल्याचे सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता. दोघांनी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 20 गाड्या जप्त करण्यात आल्या. आरोपींना आज कोर्टात हजर केलं असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.