Talegaon News : तळेगावात दोन दिवसीय कॅरम स्पर्धेला सुरुवात

एमपीसी न्यूज –  कॅरम प्रेमींच्या पुढाकारातून कै.माधव खरे व कै.मंगेश कवळेकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली आहे. (Talegaon News) या स्पर्धेचे शनिवारी (दि.21) उद्घाटन झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे सुदाम दाभाडे, मिताली मंगेश कवळेकर, मनिषा माधव खरे, शंकर हादीमणीगौडा बाळासाहेब शिंदे राहूल खळदे मयूर राजगुरव अशितोष दोडमिसे नंदू सोनवणे रावसाहेब कानवडे आदी उपस्थित होते. हि स्पर्धा 21 ते 23 जानेवारी या काळात कडोलकर कॉलनी येथील लायन दिपक शहा सभागृह येथे पार पडत आहेत.

Pune News : मोटारीचा दर जास्त लावला म्हणून दुकानदार व कामगाराला रॉडने मारहाण

या स्पर्धेचे आयोजन कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व रोटरी क्लब ऑफ तळेगाव (एमआयडीसी), लायन्स क्लब ऑफ तळेगाव,रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन (बॅच 1984- मैत्रेय ग्रुप) व खरे कॅरम क्लब तळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे स्पर्धेच्या विजेत्याला 1 लाख 53 हजारापर्यंत रोख बक्षिसे मिळणार आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिला दोघांसाठी खुली असणार आहे. दुहेरी, मिश्र दुहेरी व ज्येष्ठ नागरिक या तीन प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे.या कॅरम स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी सुत्रसंचलन अनिल धर्माधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.