Pune News : मोटारीचा दर जास्त लावला म्हणून दुकानदार व कामगाराला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज पाण्याच्या मोटारीचा दर जास्त लावला म्हणून पाच ते सहा जणांनी दुकान मालकास व त्यांच्या कामगारात दुकानात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. (Pune News) हा अजब प्रकार मुळशीतील धमालेवस्ती येथे शुक्रवारी (दि.20) दुपारी चार वाजता घडला.

याप्रकरणी महेश अरूण जोगदंड (वय 19 रा.थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.21) फिर्याद दिली असून पाच ते सहा जणां वरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maval : देशाचे नेतृत्व करण्याचे बाळकडू शिक्षणात आहे – सुधीर मुनगंटीवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे मुळशी येथे श्री साई बोअरवेल नावाचे दुकान आहे. तेथे आरोपी मोटार खरेदीसाठी आला. त्याने मोटारीचे कोटेशन मागवले. ते दर त्याला जास्त वाटल्याने त्याने फिर्यादीला एवढे जास्त दर असतात का म्हणत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

पुढे त्याने त्याचे इतर पाच ते सहा साथीदार बोलावून फिर्यादी व त्यांचा कामगार यांना शिवीगाळ करत रॉडने व लाथाबुकक्याने मारहाण केली. गर्दी जमलेली पाहून सारे (Pune News) तेथून पळून गेले. यात फिर्यादी व त्यांचा कामगार दोघे जखमी झाले असून हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.