Nigdi : दुचाकी घसरल्याच्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरुन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना चिंचवडमधील थरमॅक्स चौकाजवळ घडल्या.

अभिजित बबनराव काटकर (वय 40, रा. संभाजीनगर, चिंचवड), किरण भास्कर कानवडे (वय 29, रा. जाधववाडी, चिखली) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रूवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अभिजीत त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात जात असताना थरमॅक्स चौकाजवळ त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिजीत यांचा मृत्यू झाला.

दुस-या घटनेत, किरण 22 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ज्यूपिटर मोपेड दुचाकीवरून जात होते. भरधाव वेगात जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते थरमॅक्स चौकात पडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरण यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.