Pune : श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी

एमपीसी न्यूज – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी टाइम्स ऑफ इंडियाचे प्रतिनिधी प्रसाद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सीएनएन न्यूज 18 चे चंद्रकांत हंचाटे हे सरचिटणीसपदी निवडून आले आहेत.

उपाध्यक्षपदी मटाचे अभिजीत बारभाई व तरुण भारत, बेळगावचे सुकृत मोकाशी यांची निवड झाली, तर खजिनदारपदावर पुढारीचे सुनील जगताप यांनी बाजी मारली. चिटणीसपदी सुराज्यचे विजय मस्के व लोकमतचे लक्ष्मण मोरे बिनविरोध निवडून आहेत.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
राजा गायकवाड, कुलदीप जाधव, संदीप पाटील, संदीप मराठे, प्रशांत बिडवे, तनिष्का डोंगरे, अमोल कविटकर, विजय कुलकर्णी, शिरीष रणदिवे, अभिजित पिसे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.