Pune : आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गनमॅन निलंबित

एमपीसी न्यूज – पोलीस दलातील नोकरीचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरवापर केल्याप्रकरणी गनमॅन शैलेश हरिभाऊ जगताप या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

त्यासोबतच पोलीस नाईक परवेझ शब्बीर जमादार याला देखील निलंबित करण्यात आले आहे. पोलीस हवालदार शैलेश जगताप हे लष्कर पोलीस ठाण्यात तर पोलीस नाईक परवेझ शब्बीर जमादार हे पुणे शहर गुन्हे शाखा येथे नेमणुकीस आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  जगताप आणि जमादार यांनी नीलमणी धैर्यशील देसाई यांच्या जमीन व्यवहारात हस्तक्षेप केला. कामाच्या कार्यक्षेत्राबाहेरील काम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केले. त्याबदल्यात रोख रक्कम, दुचाकी आणि ब्रँडेड कपडे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच याबाबतची वरिष्ठ अधिका-यांना खोटी माहिती दिली असल्याने दोघांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.