Uddhav Thackeray : हिंमत असेल तर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

एमपीसी न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर सिंह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समुदायाला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray) ‘हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाले, ‘सब ठीक बा! ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल. मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. सगळ्या भारतीयांना उत्तर हवं आहे. 25-30 वर्ष आम्ही युतीमध्ये राहिलो, काय मिळालं?

आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहे. आम्ही या ठिकाणी तुमची साथ मागायला आलो आहोत. यात गैर काय? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही घरात जाऊन भाकरी भाजतात. मी कधीच मराठी-अमराठी किंवा हिंदू मुस्लीम असा भेद केला नाही. बाळासाहेब कधीच असं म्हणाले नाहीत की हिंदू म्हणजे केवळ मराठी. बोहरा समाज देखील आमच्यासोबत आहे, असे ठाकरे म्हणाले.

Chinchwad Bye-Election : भाऊंनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळेच मतदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार – चंद्रकांत पाटील

‘मी तिथे गेलो असतो तर मी हिंदुत्व सोडलं म्हटलं असतं. पण काल गेले ना भाकरी भाजायला. मग त्यांनी केलं तर बडे दिलवाला. आम्ही केलं की हिंदुत्व सोडलं. आमचं हृदय मोठं नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

‘आम्ही भेटलो तर राम-राम म्हणतो. तुम्ही भेटला की जय श्री राम म्हणता. म्हणजे राम आहेच. तर आपल्यासोबत मुस्लीम लोक देखील सोबत आहेत. आता एकजूट करण्याची गरज आहे. हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घ्या. आम्ही तयार आहोत,असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.