Amit Shah Test Negative : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त

Union Home Minister Amit Shah's corona report negative.

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ते काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहेत अमित शहा यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, आज माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मी देवाचे आणि माझ्या शुभचिंतकांचे आभार मानतो या कठीण काळात त्यांनी माझे व माझ्या कुटुंबीयांची धाडस वाढल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे.

कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी व माझ्यावर उपचार करणार्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांचे मी आभार मानतो असे अमित शहा यांनी त्यांनी ट्विट केले आहे.

अमित शहा यांची 2 ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्रामधील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.