UP News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्यनाथ यांनी स्वतः याबाबत ट्वीट करत आपली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी कोविड चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून मी सध्या होम आयसोलेट आहे. व्हर्चुअल पद्धतीने मी विविध कार्यांचा आढावा घेईन’

_MPC_DIR_MPU_II

‘उत्तर प्रदेश सरकारच्या सर्व गोष्टी सामान्य पद्धतीने सुरु आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी. तसेच, काळजी घ्यावी’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.