Upsc Result : युपीएससीत मुलींची बाजी;पुण्याचा शुभम भिसे 97 वा

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2021च्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यंदाही यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चारही जागांवर मुली आल्या आहेत. 2021 च्या युपीएससी निकालाचं हे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.

 

श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे, तर अंकीता अग्रवाल दुसरी, गामिनी सिंग तिसरी तर ऎश्वर्या शर्माने चौथा क्रमांक पटकाविला आहे.यंदा 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

 

महाराष्ट्रातील 40 हून अधिक उमेदवारांना युपीएससीच्या परिक्षेत सुयश मिळाले आहे.या निकालात राज्यातील पुण्याचा शुभम भिसे हा 97 वा आला आहे त्याशिवाय अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळविला आहे.

 

युपीएससी सीएसइ प्राय़मिक परीक्षा 10 औक्टोबरमध्ये झाली होती. त्यानंतर परीक्षेचा निकाल 29 औक्टोबर रोजी जाहिर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी या कालावधीत झाली होती. आणि त्याचा निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर झाला होता. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती ती पाच एप्रिल रोजी सुरु झाली होती आणि 26 मे रोजी संपली. आज या परीक्षांचा निकाल जाहिर झाला.

 

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा 2021 चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता वर्तविली जा होती. अखेर आज निकाल लागला.युपीएससी नागरी सेवा मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांना upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.