Vadagaon Maval News : ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी काम बंद, बोंब ठोकणे, भजन आंदोलन

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे सातारा जिल्हा श्रमिक संघ मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने मावळ पंचायत समिती समोर आज (बुधवारी) कामबंद, बोंब ठोकणे आणि भजन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला मावळमधील अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. संघटनेच्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, तालुकाध्यक्ष गणेश वाळुंजकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुका उपाध्यक्ष जीवन गायकवाड, तालुका सरचिटणीस सुखदेव गोपाळे, कार्याध्यक्ष सहादू पोटफोडे, भरत तुपे, ज्ञानेश्वर काळे, रमेश सुतार, भाऊ कल्हाटकर, संदीप तिकोने, साधना धामणकर, जयश्री शिवेकर, बाळासाहेब मोहिते, ज्योती बनसोडे, रामदास म्हसकर आदींसह बहुसंख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

10 ऑगस्ट 2020 पासून परिमंडळ निहाय वेतनवाढ व त्याची थकबाकी मिळावी. राहणीमान भत्ता गोठविण्यात आला आहे, तो मागील थकबाकीसह वाढवून मिळावा. ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जात नाही व कपात केली तरी त्याचा हिशोब ठेवला जात नाही. तसेच बँकेत भरणा केला जात नाही. सेवा पुस्तक अद्यावत करणे. 1 जुलै 2007 पासूनचा थकीत राहणीमान भत्ता फरकासह मिळावा. कर्मचाऱ्यांना  गणवेश, बूट, बॅटरी साहित्य द्या, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.