Vadgaon : घरातील कचरा कचरा गाडीतच टाका; उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा (Vadgaon) सायली म्हाळसकर यांनी वडगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. यामध्ये शहरात ठीक ठिकाणी उघड्यावर कचरा पडल्याचे आढळून आले. त्यामुळे म्हाळसकर यांनी वडगाव मधील नागरिकांना घरातील कचरा हा कचरा गाडीतच टाकण्याचे आवाहन केले. उघड्यावर कचरा टाकल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.

वडगाव नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण – 2023 मध्ये सहभाग घेण्यात आला असून स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी शहरात विविध विकास कामे सुरू असून या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षा सायली रूपेश म्हाळसकर यांनी काल शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहाणी केली.

Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीला अटक; 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

यावेळी अनेक ठिकाणी रस्ता लगत व परिसरात उघडयावर कचरा फेकलेला आढळून आला याअस्तवेस्त पडलेल्या कचऱ्यामुळे गावच्या सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला पायबंद घालण्यासाठी व सरासपणे उघडयावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर जरब बसावी म्हणून नगरपंचायतच्या (Vadgaon) माध्यमातून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याअधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पथक तयार करण्यात येणार आहे.

नागरिकांनी यापूढे उघडयावर कचरा न फेकता तो कचरा गाडी टाकावा असे नगरपंचायतीच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.