Vadgaon Election: वडगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र कुडे

एमपीसी न्युज : वडगाव नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक वडगाव शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे गटनेते, नगरसेवक राजेंद्र विठ्ठलराव कुडे यांनी जिंकली.(Vadgaon Election) उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी (दि.27) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक किरण म्हाळसकर यांचा चार मतांनी राजेंद्र कुडे यांनी पराभव केला. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 

मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या कुडे यांना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासह स्वतः नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पूजा वहिले, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, सायली म्हाळसकर अशी 10 मते मिळाली तर भाजपचे किरण म्हाळसकर यांना विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर,दीपाली मोरे अशी ६ मते मिळाली. यावेळी भाजपच्या नगरसेविका सुनिता भिलारे व दशरथ खेंगले हे गैरहजर होते.

 

Milind Parande : समाज जीवनाच्या सर्व अंगात हिंदुत्वाचा संचार हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे फलित

 

निवडीनंतर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, (Vadgaon Election) मावळ तालुका राष्ट्रवादीचे वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विशाल वहिले, विलास दंडेल, चंदुकाका ढोरे, राजेश बाफना, प्रवीण ढोरे,सुरेश जांभुळकर, मंगेश खैरे,सुनील शिंदे,आफताब सय्यद, शरद ढोरे, गणेश प.ढोरे,सोमनाथ धोंगडे, शैलेश वहिले, निलेश म्हाळसकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, भाऊसाहेब ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.