Vadgaon Maval : वडगांव कोर्टात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे मनस्ताप

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारात होत असलेल्या अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पार्किंगमुळे वकील, न्यायाधीश, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी या सगळ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी वडगांव बार असोसिएशनने केली आहे. अनेकदा ज्यांचे कोर्टामध्ये काम नाही अशा व्यक्ती देखील या ठिकाणी गाड्या उभ्या करून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्यांचे कोर्टात काम आहे त्यांचीच गाडी आत सोडावी असे निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.