Vadgaon Maval : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे खो-खो स्पर्धेत वर्चस्व

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित (Vadgaon Maval) कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षाखालील मुले व मुली, तसेच 17 वर्षाखालील मुले यांच्या संघाने तालुकास्तरीय खो – खो स्पर्धा जिंकून आपले मावळ तालुक्यात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले आहे. या सर्व संघांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्यातर्फे सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तालुक्यातील अनेक शाळातील संघ सहभागी झाले होते. त्यात तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुले व मुली यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आपली चुणूक दाखवली.

Vadgaon Maval : एल अँड टी कंपनीतील कामगारांचा वाद चिघळला; तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा आमदार शेळके यांचा इशारा

या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडा शिक्षक गोरख काकडे व सुवर्णा झणझणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोजच्या सरावामुळेच हा विजय आम्ही प्राप्त करू शकलो अशी सर्व विजेत्यांची मते होती. या सर्व संघांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी खूप खूप अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.