Vadgaon Maval : मावळ राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत यांचे “डोनेशन चॅलेंज”मधून आवाहन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे सध्या या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर अनेक चॅलेंज दिली आणि घेतली जात आहेत. त्याच्यामध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून “डोनेशन चॅलेंज” दिले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री कोरोना सहायता निधी मध्ये 101 रुपये देणगी द्यावी आणि आपल्या मित्र परिवार अथवा आपल्या कुटुंबामधील अन्य 5 लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना ही देणगी देण्यास प्रोत्साहित करावे.

त्यांनाही पुढील 5 लोकांना देणगी देण्यास प्रोत्साहित करण्यास सांगावे, ही अशी पाच लोकांची देणगी साखळी निरंतर सुरू राहावी. आपल्या महाराष्ट्र सरकारला कोरोनाविरुद्ध च्या लढाईत आर्थिकदृष्ट्या पाठबळ द्यावे. हि देणगीचा स्क्रीनशॉट 9822042484 या नंबरला पाठवा आणि आपल्या WhatsApp Status ला ठेवा, असे आवाहनही त्यांनी यामाध्यमातून केले आहे.

  • देणगी पाठविण्यासाठी अधिक माहिती :
    Maharashtra CM Relief Fund COVID-19
    Chief Minister’s Relief Fund-COVID 19
    SBI Acc. number: 39239591720
    IFSC CODE: SBIN0000300
    State Bank of India, Mumbai : 400023

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.