Vadgaon Maval : तहसील कार्यालयातून माहिती देण्यास टाळाटाळ, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचा आरोप

एमपीसी न्यूज – तहसील कार्यालय वडगाव मावळ (Vadgaon Maval ) माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवून ही अर्जाला कोणतेही उत्तर दिले जात नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे सचिव प्रदीप नाईक यांनी मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे.

यासंबंधी प्रदीप नाईक यांनी लेखी अर्ज केला असून त्यात म्हटले आहे की, मागील दोन माहिन्यापासून माहितीसाठी अर्ज केले जात आहेत. कायद्यानुसार ही माहिती मिळणे हा आमचा अधिकार आहे. ही माहिती 30 दिवसांच्या आत मिळणे अपेक्षित आहे, मात्र तहसीलदार कार्यालयाकडून तसा कोणताही प्रतिसाद दिला जात नाही.

आपण भेटल्यानंतर माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. तरी सामान्य नागरिकांना माहिती मिळण्यास एवढा विलंब का केला जात आहे, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणे म्हणजे माहिती अधिकार कायदा 2005 ला पायदळी तुडवण्यासारखे आहे.

Maharashtra News : राज्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडणार

तसेच कर्मचाऱ्यांना कायद्याचे गांभीर्य कळत नसले तर त्वरीत त्यांना माहिती अधिकार कायदा ( Vadgaon Maval ) अधिनीयम 2005 चे प्रशिक्षण द्यावे. तसे यशदा तर्फे प्रशिक्षण वर्ग ही घेतले जातात. कारण कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. तरी लवकरात लवकर संबंधित माहिती पुरवावी, अशी मागणीही नाईक यांनी अर्जाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.