Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायत महिलांना मोफत देणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत कडून मावळ (Vadgaon Maval ) दुर्गा अभियान राबविले जात आहे. यामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात शस्त्र पूजन करून करण्यात आली. वडगाव आणि कातवी येथील मारुती मंदिर परिसरात हा प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहे. पहिल्या बॅचमध्ये सुमारे 50 मुलींनी नाव नोंदणी केली आहे.

यावेळी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुजा वहिले, नाथा घुले, संतोष पिंपळे,मोनाली घुले,रूपाली चव्हाण, प्रशिक्षक किरण आडगळे, शहर समन्वयक अधिकारी दिगंबर बांडे आणि प्रशिक्षणार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maval News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

वडगांव शहरातील प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पंचमुखी मारुती मंदिर परिसरात दररोज सांय ठीक 5 वाजता तर कातवी येथील मारुती मंदिर परिसरात दररोज दुपारी 4 वाजता स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या स्वसंरक्षण प्रशिक्षणात शहरातील जवळपास 45ते 50 मुली सहभागी झाल्या आहेत.

संरक्षण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुलींना आपापल्या  पालकांनी वेळेवर वरील ठिकाणी पोहचते करून तसेच प्रशिक्षण संपल्यावर घरी सुखरूप घेऊन जावे. प्रशिक्षणार्थींनी कोणतीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये. प्रशिक्षणार्थी मुलींनी येताना सलवार कुर्ता परिधान केलेला असावा. तसेच येताना सोबत पाणी बॉटल घेऊन येणे इत्यादी सूचना उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीं आणि पालकांना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केल्या.

यावेळी सभापती पुजा वहिले यांनी शहरातील मुलींबरोबर महिला भगिनीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. सर्व महिला भगिनीनी (Vadgaon Maval ) या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन वहिले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.