Vadgaon News : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी

तहसीलदार मधुसूदन बर्गे व मावळचे आमदार सुनील शेळके यांना मावळ तालुका सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबरोबरच इतर मागण्या त्वरीत मार्गी लावाव्यात, अशी मागणी मावळ तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आली आहे.

या मागणीचे निवेदन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व मावळचे आमदार सुनील शेळके यांना देण्यात आले आहे.

मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी किशोर भेगडे, गणेश भेगडे, भाऊसाहेब ढोरे, संतोष येवले, तुषार वहिले, विजय तिकोने, सुशील शिंदे, सतिश शेलार, विष्णू हुलावळे, शरद कुटे, संजय शिंदे, प्रवीण तिकोने, धनंजय मोरे, चंद्रकांत दाभोळे, अ‍ॅड. अमोल दाभाडे, अ‍ॅड. सुधीर भोंगाडे, अ‍ॅड. लक्ष्मण घोजगे, अ‍ॅड. निलेश ढोरे, अ‍ॅड. देवा मराठे आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी व आरक्षण मिळण्यासाठी सरकारने योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. निष्णांत वकील देऊन बाजू मांडावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. मराठा आरक्षण मिळेपर्यंत पोलीस व इतर शासकीय भरतीला स्थगिती देऊन आरक्षणात आंदोलनात मराठा समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत.

कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना तत्काळ शासन करावे. आंदोलनात शहीद झालेल्या मराठा बांधवांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा द्यावा. त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी व कुटुंबीयांना पेन्शन देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.