Pune : अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम

एमपीसी न्यूज – भवानी पेठेतील पाटील चौकात अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले. या प्रसंगी तुषार पाटील, नगरसेवक डॉ. भरत वैरागे, उत्सवप्रमुख गोविंद भिसे व राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी, होममिनिस्टर, खेळ पैठणीचा, गौरी सजावट स्पर्धा, लहान मुलांसाठी जादूचे खेळ, अंध व्यक्तींचा गाण्याचा कार्यक्रम, सप्तरंग महाराष्ट्राचे असे अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. यासह या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धकांना भेट वस्तू देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.