Vadgaon Maval : नारायणराव काळोखे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विलासराव काळोखे यांची निवड

सचिवपदी विश्वनाथ काळोखे

एमपीसी न्यूज- तळेगांव दाभाडे येथील नारायणराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विलासराव काळोखे तर सचिवपदी विश्वनाथ काळोखे यांची निवड करण्यात आली.

संस्थेच्या सभेमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ श्रीमती ए.एस.दाते यांच्या अध्यक्षतेखाली ही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली . मावळते अध्यक्ष ॲड. शरद कदम यांनी काळोखे यांचा सन्मान करून त्यानां शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नगरसेवक सूर्यकांत काळोखे, तज्ञ संचालक बाजीराव काळोखे, संजय संदानशिव यांच्यासह संचालक श्रीकांत वायकर, गणेश साबळे, ॲड. कुणाल काळोखे, चैतन्य कोरडे, निशांत काळोखे, जयश्री काळोखे, मेघा जगताप, मांदळे मॅडम आदी सह संस्थेचे खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विलासराव काळोखे हे मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे ते संस्थापक आहेत. आपल्या निवडीनंतर विलासराव काळोखे यांनी परिसरातील लघु उद्योगांना भांडवल निर्मितीसाठी व गरीब होतकरू तरुणांना उद्योग व्यवसाय निर्मितीवर भर देऊन सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.