Pimpri : विश्व सिंधी सेवा संगमच्या चिंचवड महिला शाखेचे उदघाटन

एमपीसी न्यूज – विश्व सिंधी सेवा संगम या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने चिंचवड महिला शाखेचे उदघाटन नुकतेच संस्थेच्या विश्वस्त दिव्या बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. 
पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदाधिकारी अनुप थडानी, डॉ. अजित मन्याल,  मुकेश बजाज, आशा कलवाणी, संजय ताहिलाणी आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात  सिंधी गुरु झुलेलाल यांच्या पुजनाने झाले.
 दिव्या बजाज म्हणाल्या, जगातील 17 देश 29 युनियन टेरोटरीमध्ये आपल्या संस्थेच्या शाखा सुरु झाल्या असून पुढील महिन्यात सिल्वासा येथे सिंधी समाजाचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. यावेळी सर्व पदाधिका-यांनी अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त सिंधी समाजास सहभागी करण्याचे प्रयत्न करावेत. यावेळी त्यांनी नवीन नेमणुक झालेल्या सर्व पदाधिका-यांना आपआपल्या पदाची जबाबदारी कशी पार पडावी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज मंघणानी यांनी केले. सूत्रसंचालन निकिता रामणानी यांनी केले. नानक पंजाबी यांनी आभार मानले. मनोहर जेठवानी, ज्वानी थडानी, इंदर वाधवानी, रचना मंघरजानी, कांचन रामणानी आदींनी संयोजन केले.
डॉ. अजित मन्याल म्हणाले की, संस्तेच्या सर्व सभासदांनी समाज संघटन करीत असताना इतर समाजाचे सणही साजरी करावेत. त्यात विशेषत: महिलांचा जास्त सहभाग असावा. सर्व राजकीय पक्षांनी समाजाच उपयोग केला पण सत्तेत मात्र स्थान दिले नाही याची खंत वाटते.
अनुप थडानी म्हणाले की, आपण संस्थेच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाकडून सिंधी साहित्य परिषद निर्माण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.