Wakad : बसमध्ये चो-या करणाऱ्या 4 महिलांना अटक; पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : बसमध्ये चोरी करणाऱ्या (Wakad) चार महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. तर, 4 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनिया अजय कांबळे (वय 31), मिना मिलींद उपाध्ये (वय 30), सुमन प्रताप काळे (वय 29) लक्ष्मी बिलीमोर उपाध्ये (वय 21) सर्व रा. राजीव गांधी नगर झोपडपट्टी विश्रांतवाडी अशी अटक महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी बसमध्ये दागिने चोरीचे प्रमाणे वाढले होते. या अनुषंगाने पोलिसांचे विशेष तपासी पथक तयार करण्यात आले. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी विश्वासू बातमीदारामार्फत बातमी काढणेचे काम सुरु केले.

Pimpri – स्त्रियांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी समान संधी

दरम्यान, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांना विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही संशयित महिला डांगे चौकातील बिआरटी बस स्टॉप जवळ फिरत आहेत. अशी बातमी पोलिसांनी डांगे चौक येथे जाऊन बिआरटी बस स्टॉप येथे थांबलेल्या 4 महिलाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्यांनी (Wakad) पिंपरी चिंचवड परिसरातील बसमधील चोरीचे 5 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी 4 लाख 70 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे-1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे-2 रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार विभीषण कन्हेरकर, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार बंदु गिरे, संतोष वर्ग, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, पोलीस नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलीस शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे,कौलेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.