Wakad : दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या मुलाला केली टोळक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या (Wakad) मुलाला आणि त्याच्या मित्राला मोबाईल नंबर न दिल्याने टोळक्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी दीड वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.

श्रेयस मारुती कस्पटे (वय 20, रा. कस्पटे वस्ती, वाकड), अथर्व गणेश कस्पटे (वय 18, रा. वाकड), एक अल्पवयीन मुलगा आणि तीन ते चार अनोळखी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 15 वर्षीय मुलाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : रस्त्यांवरील खड्डे बुजवा, पाणीपुरवठा सुरळीत करा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा दहावीचा पेपर देऊन घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी एका मुलाचा नंबर फिर्यादीकडे मागितला. तो नंबर न (Wakad) दिल्याने आरोपींनी फिर्यादीस आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.