Wakad : कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली 1.28 लाख रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज : कर्मचाऱ्याने कंपनी ऑफिसमध्ये 1.28 लाख रुपयांची चोरी (Wakad) केल्याची घटना 4 जुलै रोजी घडली. याबाबत अक्रम अरब (वय 30 वर्षे, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi Fraud : मोबाईल अर्ध्या किंमतीत देतो म्हणून 55,000 रुपयांची फसवणूक

अमनकुमार रॉय उर्फ बिहारी या आरोपी विरोधात 4 जुलै रोजी भा. द. वि. कलम 381अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या ए. ए. कॉन्स्ट्रक्शन कंपनीत आरोपी अकाऊंटन्ट म्हणून काम करत होता. आरोपीने 28 मे 2022 ला ऑफिसमधील खोलीचा दरवाजा बंद करून खोलीतील फिर्यादी यांचा फोनमध्ये असलेल्या ऍक्सिस बॅंकच्या (Wakad )ऍपमधून यू.पी.आय प्रणालीद्वारे 1 लाख रुपये बेकायदेशीर ट्रान्झक्शन केले. 15,000 रुपये किंमतीचा लॅपटॉप व रोख रक्कम असे एकूण 1.28 लाख रुपये चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.