Hinjawadi Fraud : मोबाईल अर्ध्या किंमतीत देतो म्हणून 55,000 रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : मोबाईल फोन अर्ध्या किंमतीत देतो (Hinjawadi Fraud) म्हणून एका महिलेकडून 55,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना हिंजवडी येथे घडली. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी वेदांत सिंग नवीन सिंग (पत्ता माहित नाही) याच्या विरोधात भा. द. वि. कलम कायदा 419, 420, 34 सह आयटी ऍक्ट कलम 66 क, 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान त्यांच्या राहत्या घरी वधु-वर सूचक मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुपला बायोडाटा पोस्ट केल्याने त्यांची ओळख आरोपीसोबत ओळख झाली होती.

PCMC : महापालिका ‘या’ 20 ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार

त्यामुळे आरोपीने सांगितले, की तो ऍपल (Hinjawadi Fraud) कंपनीमध्ये सेल्समन म्हणून कामास आहे. फिर्यादीला विश्वासात घेऊन ऍपल कंपनीचा आयफोन 14 हा 50 टक्के डिस्काउंटमध्ये देतो, असे सांगून त्यांना 55,000 रुपये फोनसाठी फोन पे वरून पाठविण्यास सांगून त्यांना कुठलाही फोन न देता पैसे परत न करता स्वतः साठी वापरून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.