Wakad Crime : घरात झोपलेल्या महिलेवर खुनी हल्ला; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरात झोपलेल्या महिलेवर अज्ञातांनी खुनी हल्ला केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 16) तुळजाभवानी नगर, काळेवाडी येथे घडली.

छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50, रा. तुळजाभवानी नगर, काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयात छाया यांच्या घरातील लाईट गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वजण रात्री घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते. रात्री झोपेत असताना छाया यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी खुनी हल्ला केला. यामध्ये छाया गंभीर जखमी झाल्या.

हा प्रकार घरातील नातेवाईकांच्या सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आला. नातेवाईकांनी छाया यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाकड पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.