Wakad : वाकडच्या तडीपार गुंडाला देहूगावातून अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथील तडीपार गुंडाला देहूगावातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शनिवारी दि. 16) केली.

इंद्रया उर्फ इंद्रजित बापू सपकाळे (वय 25, रा. मजीद समोर, काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड काळखडक परिसरात राहणार तडीपार गुंड इंद्रया देहू परिसरात फिरत असल्याची खबर पोलिस कर्मचारी आशिष बोटके आणि शैलेश यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी देहूगाव येथील कमानीजवळ सापळा रचून पकडले. त्याच्याकडे पुणे जिल्ह्यात येण्याबाबतची परवानगी घेतली आह का ? असे विचारले असता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक केली. इंद्रयाला 6 फेब्रुवारीपासू पुणे जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर चोरी, लूटमार, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, उमेश पुलगम, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.