Wakad Crime News : मेव्हणीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – मेव्हणीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेला बहिणीने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 28) रहाटणी येथे घडला.

याबाबत मंगल लक्ष्मण शिंदे (वय 32, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशा सुरेश चव्हाण (वय 32), सुमन राम शिंदे (वय 30, दोघी रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी फिर्यादी मंगल यांच्या बहिणीच्या घरी त्यांची मेव्हणी आली होती. त्यामुळे मंगल या मेव्हणीला भेटायला बहिणीच्या घरी गेल्या. त्यावेळी बहिणीने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच मेव्हणीने देखील फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण केली. यात फिर्यादी महिला जखमी झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.