Wakad Crime News: कन्स्ट्रक्शन साहित्य चोरी करून भंगारात विकले, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कन्स्ट्रक्शन साहित्य चोरी करून भंगारात विकल्याची घटना उघडकीस आली आहे. मीहार प्रोजेक्ट, वाकड याठिकाणी शनिवारी (दि.29) हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मीट्ठू मुन्ना (वय 23, रा. वाकड रोड, हिंजवडी), सलीम अब्दुल तांबोळी (वय 48, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच आरोपी अंकुर विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विकास विनोदी त्यागी (वय 38, रा. जांभुळवाडी, आंबेगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून मीहार प्रोजेक्ट, वाकड येथील कन्स्ट्रक्शन साहित्याची चोरी केली. तसेच, चोरी केलेले साहित्य भंगारात विकले असं फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक यलमार अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.