Wakad Crime News : मटका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – वाकडमधील कस्पटे वस्ती येथे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा मारला. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी साडेपाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे गणेश मंदिराजवळ करण्यात आली.

बाबुलाल ज्योतीराम दंदी (वय 53), मछिंद्र प्रभू बनसोडे (वय 36, दोघे रा. कस्पटे वस्ती, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक सागर वामन सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती, वाकड येथे गणेश मंदिराजवळ मोकळ्या जागेत जुगार मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात बाबुलाल आणि मछिंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.