Wakad Crime News : प्रेमसंबंधास नकार देणाऱ्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – महिला आणि तिच्या पतीवर सोशल मीडियाद्वारे पाळत ठेवली. महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केली. तिने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिला आणि तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन राजेंद्र वहिले (वय 25, रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार एप्रिल 2020 ते 8 मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याने फिर्यादी महिला आणि तिच्या पतीवर सोशल मीडियाद्वारे पाळत ठेवली. महिलेला वारंवार फोन करून ‘तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर तुझे व माझे एकत्रित असणारे पर्सनल फोटो तुझ्या नव-याला व नातेवाईकांना पाठवेन’ अशी धमकी दिली.

‘तू मला आवडतेस. तू तुझ्या नव-याला सोडून माझ्याकडे ये. मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचे आहे. मला तुझ्याशिवाय करमत नाही’ असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला. आरोपीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास महिलेने नकार दिला असता आरोपीने फोनवरून शिवीगाळ करून ‘तुला व तुझ्या नव-याला जगू देणार नाही’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.